"अखिल वैश्य सोनार समाज समन्वय महासंघ""
वैश्य सुवर्णकार बांधवांसाठी समर्पित असे एकमेव व्यासपीठ...!!
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असतांना , भारतीय अर्थ आणि समाज व्यवस्थेमध्ये,अनेक आमूलाग्र बदल होत आहेत. अनेक सामाजिक प्रश्न आज निर्माण होऊ पहात आहेत. काळाची पावले ओळखून, समाज संघटन हे सर्वार्थाने "शक्तीशाली" आणि " सम्रुद्ध " करण्याच्या एकमेव ध्येयाने ,अनेक समाज धुरंधरांच्या प्रबळ इच्छाशक्ती मधून, दिनांक २३ जानेवारी २०१० रोजी "महासंघाची" स्थापना झाली..!!
सर्वं स्थानिक संघाच्या वैयक्तिक निर्णयांमध्ये बाधा न आणता , सर्वांमध्ये समन्वय साधून,एक दिशा,एक विचार,एक सूत्र समोर ठेवित ,सामाजिक परीवर्तन घडविणे हाच एकमेव उद्देश..!!
सद्य परिस्थितीमध्ये अतिशय गंभीर होऊ पहात असलेल्या विवाह अडचणींबाबत विस्तृत मंथनातून उकल करणं, वधू-वरांसाठी अद्यायावत माहिती स्रोत उपलब्ध करून देणं ,संपूर्ण भारतामधील वैश्य सोनार बांधवांची ई- नाम सूची बनविणं, उच्च शिक्षण , रोजगार संधी, वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत , महिला सबलीकरण ,अशा अनेक मुद्यांवर निगडित, तज्ञ् आणि अनुभवी बांधवांच्या मदतीने , उपाय शोधून यामध्ये परीवर्तन घडविणं , यासाठी महासंघ सातत्याने प्रयत्नशील आहे..!!
या "परीवर्तन यात्रेत" आपण ही आपला अमूल्य सहभाग नोंदवा आणि आपले समाजिक कर्तव्य पार पाडा.!!!
नवीन विवाह इच्छुक सदस्य
आमचे ध्येय
" एकीतून संघटना, संघटनेतून समर्थ सामर्थ्यातून, परिवर्तन"
संस्कृती , परंपरा, हिंदूरिती रिवाज कला, क्रीडा, यांचे बाबत जागृती निर्माण करून नव पिढी समोर एक आदर्श घालून देणे .
आवश्यक्यते अनुसार प्राधान्यानाने प्रमुख शहरामध्ये स्वतःचे समाज भवन निर्मिती साठी प्रयन्तशील रहाणे.
आमची दृष्टी
आधुनिक कालसुसंगत तंत्रज्ञान , तंत्र समृद्ध आणि विद्याविभूषित जेष्ठ समाज धुरंधर आणि कल्पक आणि नाविन्यतेचा ध्यास असलेली युवाशक्ती यांचा मेळ साधत , वैश्य सुवर्णकारांचा एकसंध आणि जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त, आदर्श समाज घडविणे आणि सन २०५० मधील "विकसित भारत", हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न साकार करणे..
आमची उदिष्टे
सर्व स्थानिक संघामध्ये समन्वय साधत , समाज संवर्धनासाठी एक दिशा, एक विचार आणि एक सूत्र देऊन काल सुसंगत परिवर्तन घडविणे . सद्य स्थितीत अतिशय गंभीर होऊ पहात असलेल्या विवाह संबंध जुळवितांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्नाची विस्तृत मंथनातून उकल करणे व वधू वारांसाठी अद्ययावत माहिती स्रोत उपलब्ध करून देणे .
सामाजीक वार्तांकन


आमचा इतिहास
सोनार समाज महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अभिन्न भाग म्हणून शतकानुशतके कार्यरत आहे. त्यांच्या अप्रतिम कारागिरी आणि सूक्ष्म डिझाईन्ससाठी सुवर्णकार प्रसिद्ध आहेत, ज्यांनी लग्न, सण आणि पारंपरिक प्रसंगी दागिन्यांना सजवले आहे. बदलत्या काळानुसार, समाजाने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे, तरीही आपल्या परंपरेशी निष्ठा ठेवली आहे. आज, सोनार समाज महाराष्ट्र हा भूतकाळ आणि भविष्य यांच्यातील पूल म्हणून उभा आहे, कारागिर, उद्योजक, उच्च शिक्षित आणि उत्साही होतकरू सामाज बांधवांना एका शृंखलेमध्ये गुंफतो .
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
या मंचावर नोंदणी करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
1️⃣ पालक किंवा उमेदवार सदस्यत्व निवडा. 2️⃣ नोंदणी फॉर्म भरा आणि आवश्यक माहिती द्या. 3️⃣ सदस्यत्व शुल्क भरा (पालक सदस्यत्व ₹???, उमेदवार सदस्यत्व ₹???). 4️⃣ तुमचे खाते सक्रिय होईल आणि तुम्ही प्रोफाइल तयार करू शकता.
माझी नोंदणी केल्यानंतर माझे प्रोफाइल कधी सक्रिय होईल?
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर 24 तासांच्या आत तुमचे प्रोफाइल सक्रिय केले जाईल.
- आमच वधू-वर विषयक विभाग अधिक सोपी, सुरक्षित आणि यशस्वी करण्यासाठी आमची टीम सदैव प्रयत्नशील आहे.
- आम्हाला माहित आहे की तुमच्या मूल्यांशी, संस्कृतीशी आणि आकांक्षांशी सुसंगत असा जीवनसाथी शोधणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
- म्हणूनच आम्ही प्रत्येक पायरीवर तुम्हाला मदत करण्यास तयार आहोत.
- तुमचे काही प्रश्न असतील, अभिप्राय द्यायचा असेल किंवा अधिक मदतीची गरज भासेल, तर कृपया आम्हाला नक्की कळवा.
- आमचे सपोर्ट टीम सदस्य नेहमी तुमच्या सेवेत आहेत.





