वैश्य सोनार महासंघ हा समाजातील विविध उपक्रम आणि प्रकल्प राबवून एकता आणि सामाजिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. या दिशेने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत, महासंघाने “वधू वर” या वेबसाइटवर “सांस्कृतिक कट्टा” हे विशेष व्यासपीठ लेखकांसाठी खुलं केलं आहे.
सांस्कृतिक कट्टा – काय आहे हे व्यासपीठ?
“सांस्कृतिक कट्टा” हे एक डिजिटल व्यासपीठ आहे, जिथे लेखक, कवी, इतिहासकार, साहित्यप्रेमी आणि समाजहितचिंतक आपले विचार, साहित्यकृती आणि समाजोपयोगी लेखन प्रकाशित करू शकतात. या माध्यमातून समाजातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांना वाचा फोडण्याची संधी मिळेल.
“सांस्कृतिक कट्टा” मुख्यतः खालील व्यक्तींना उपयुक्त ठरेल –
✅ नवोदित तसेच प्रथितयश लेखक: आपल्या लेखनकौशल्याला वाचकांपर्यंत पोहोचवण्याची संधी.
✅ इतिहास संशोधक: वैश्य सोनार समाजाचा इतिहास आणि वारसा मांडण्यासाठी.
✅ कवी आणि साहित्यिक: आपल्या काव्यरचनांचा प्रसार करण्यासाठी.
✅ समाजसेवक व विचारवंत: समाजोपयोगी विचार मांडण्यासाठी.
✅ विद्यार्थी आणि संशोधक: प्रबोधनात्मक लेखनासाठी.
“सांस्कृतिक कट्टा” वर आपले लेखन प्रकाशित करण्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबावी –
✅”वधू वर” वेबसाइटला भेट द्या.
✅ सांस्कृतिक कट्टा विभाग उघडा आणि लेखक म्हणून नोंदणी करा.
✅ आपले लेख, कविता, कथा किंवा संशोधनात्मक लेख अपलोड करा.
✅ संपादकीय टीम लेखाचे परीक्षण करून ते संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल.
वैश्य सोनार महासंघाने हे व्यासपीठ सुरू करण्यामागील उद्दिष्ट –
✅ समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन करणे.
✅ नवोदित लेखकांना एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
✅ समाजाच्या प्रगतीसाठी वैचारिक आणि प्रेरणादायी लेखनास चालना देणे.
लेखकांसाठी सुवर्णसंधी!
“सांस्कृतिक कट्टा” लेखकांसाठी आपल्या विचारांना वाट मोकळी करून देणारे एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. जर आपण लेखक असाल आणि आपल्या लिखाणाद्वारे समाजात योगदान देऊ इच्छित असाल, तर आजच या व्यासपीठाचा भाग व्हा!

Subhecha
धन्यवाद!
seen no option to register as “writer”
Hi Kaustubh, Thank you for showing interest as a writer. You may reach our technical team (Ratnesh Sonar) to create your account as writer for this forum.
शुभ आणि उत्तम सुरुवात. अभिनंदन.
शुभ आणि उत्तम सुरुवात. अभिनंदन.
धन्यवाद. हा कट्टा सर्वांच्या सहभागाने अधिकाधिक समृद्ध होत जावा अशी आमची मनापासून इच्छा आहे!
खूप छान उपक्रम !!