टीव्ही आणि सोशल मीडियाच्या प्रभावी युगातही लेखनाची ताकद कमी झालेली नाही. लेखन हे विचारांना गहिरं रूप देतं, प्रश्न निर्माण करतं आणि वाचकाला अंतर्मुख करतं. लेखनामध्ये संयम, अभ्यास आणि विश्लेषण यांचा समावेश असतो, जे टीव्ही किंवा सोशल मीडियात फारसं दिसून येत नाही. लेखनातून समाजात क्रांती घडू शकते.
लेखन विचारांना दिशा देतं. एखादा लेख, कादंबरी किंवा कविता समाजातील चुकीच्या गोष्टींकडे लक्ष वेधू शकते तसेच चांगल्या गोष्टींना समाजासमोर आणून योग्य सन्मान देऊ शकते. लेखन हे वाचन संस्कृती वाढवतं आणि ज्ञानाची खोल समज देते. टीव्ही/सोशल मीडिया यांचा प्रभाव क्षणिक असतो, पण लेखन दीर्घकाळ टिकतं. इतिहासातील अनेक क्रांतींच्या मागे पुस्तके आणि विचारवंत लेखक होते. लेखन हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. लेखन हे खोलवर परिणाम घडवणारी कला आहे. जर ते प्रामाणिकपणे आणि सजगतेने वापरलं, तर समाजमन घडवण्याची ताकद अजूनही लेखनाकडे आहे.
सांस्कृतिक कट्टा तर्फे आम्ही आवाहन करतो की समाजातील अधिकाधिक लेखकांनी पुढे घेऊन या व्यासपीठावर लिखाण करावे!

🙏🙏